एक होता कार्व्हर सारांश – प्रेरणादायी पुस्तक परीक्षण (मराठी) पुस्तकपरिचय book review in Marathi

   जगात काही माणसं आपल्या कर्तुत्वाने इतिहासाचा चेहराच बदलून टाकतात. ‘एक होता कार्व्हर’ हे लेखिका वीणा गवाणकर यांच एक प्रभावी मराठी चरित्रात्मक पुस्तक अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्वाची गाथा सांगतं.  जी काळोख्या गुलामीतून प्रकाशाकडे झेप घेते. यामध्ये अमेरिकेतील महान कृषी शास्त्रज्ञ George Washington Corver यांच्या जीवनकहानीचा थरारक प्रवास मांडलेला आहे.

एक होता कार्व्हर सारांश  – प्रेरणादायी पुस्तक परीक्षण (मराठी) पुस्तकपरिचय book review in MarathiBook review in Marathi
एक होता कार्व्हर सारांश  – प्रेरणादायी पुस्तक परीक्षण (मराठी) पुस्तकपरिचय book review in Marathi


पुस्तकाचे नाव - एक होता कार्व्हर

लेखिका – वीणा गवाणकर

प्रकाशक – राजहंस प्रकाशन

प्रकार – चरित्रात्मक, प्रेरणादायी साहित्य

एक होता कार्व्हर –  पुस्तकपरिचय

   'एक होता कार्व्हर' या पुस्तकात वीणा गवाणकर यांची लेखनशैली ओघवती, भावस्पर्शी आणि तपशीलवार आहे. त्यांच्या स्पष्टशैलीमुळे जॉर्ज कार्व्हर यांचा संघर्ष, जिद्द, सामाजिक समर्पण आणि वैज्ञानिक दृष्टीकोन जिवंत होतो.

 

एक होता कार्व्हर सारांश  – प्रेरणादायी पुस्तक परीक्षण (मराठी) पुस्तकपरिचय book review in Marathi

   अमेरिकेतील कृष्णवर्णीय नागरिक म्हणजे त्याकाळचे गुलाम. आफ्रिकेतून तस्करी करून आणलेल्या निग्रोंची धनाढ्य गोरे खरेदी करायचे. या दलालीतून गुलामांना पळवणाऱ्या टोळ्या तयार झाल्या. अशाच एका टोळीने मेरी नावाच्या गुलाम स्त्रीला एका रात्री पळवले. शेतीवाडी बघतांना आपल्या एकाकी पत्नीला मदत व्हावी म्हणून; मोझेस कार्व्हर यांनी तिला विकत घेतली होती.

   मेरीचा नवरा दुसरीकडे गुलाम म्हणून राबता राबता दगावला. मोठा मुलगा जास्त दिवस टिकला नाही. आणि मेरीला टोळधाडीने पळवले. मागे राहिलं दुबळ्या श्वासामुळे मरणोन्मुख असणारं काळ मुटकुळ दोन महिन्याचं बाळ. म्हणजे जॉर्ज कार्व्हर.

   सुझन आणि मोझेस या कार्व्हर दाम्पत्यांनी मोठ्या कष्टाने या बाळाला जगवलं. त्यांच्या देखभालीने हे दुबळं पोर तग धरू लागलं. बहरलेल्या निसर्गाच्या सानिध्यात सुखावू लागलं.


शिक्षणासाठीचा संघर्ष.

एक होता कार्व्हर - शिक्षणासाठीची संघर्ष कथा

   शेतावर दिवस रात्र राबण्यासाठी खरेदी केलेल्या गुलाम निग्रोंना खुराटाच्या बाहेर पाय ठेवण्याचही स्वतंत्र नव्हतं. त्यामुळे शिक्षण आरोग्य, प्रवास अशा सार्वजनिक व्यवस्थेची दार त्यांच्यासाठी कायम सताड बंदच. अशाही परस्थितीत वयाने खुपचं लहान असणारा जॉर्ज शिक्षणाच्या ओढीने, फक्त अंगावरच्या कपड्यानिशी घराबाहेर पडला.

   निवाऱ्याची सोय नव्हती, खायला अन्न नव्हतं, गणवेश, पुस्तके, शाळेचा प्रवेश कशाचाच पत्ता नव्हता. तरीही तो झगडत होता. आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर सुरक्षित जग सोडून, नियतीशी टक्कर देत होता.

संघर्षाची वाटचाल.

   पडेल ती काम करायची, मिळेल ते अन्न खायचे, पडक्या गोठ्यात झोपायचे. दिवसभर शाळा आणि नंतर पोटाचा प्रश्न मिटवण्यासाठी मरमर काबाडकष्ट करायचे. कित्येकवेळा उपाशी राहून दिवस काढले. मजल दरमजल करत ज्ञानयात्रा अखंड, अविरत सुरु ठेवली. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण पूर्ण केले.

वर्णद्वेषाची झळ.

   या प्रवासात जॉर्जला शाररीक कष्टांसोबत अतोनात मानसिक त्रास सोसावा लागला. वर्णभेदाने ग्रासलेल्या प्रदेशात जॉर्जला भेदभाव, हेटाळणी, तिरस्कार, अपमान, अवहेलना याचा पदोपदी सामना करावा लागला. शिक्षणात कमालीची गती असूनही केवळ निग्रो असल्यामुळे त्याला खुपदा प्रवेश नाकारला गेला. असचं एकदा हायलंड विद्यापीठाकडून जॉर्जला प्रवेशासोबत स्कॉलरशीप देणार असल्याचं पत्र मिळालं. आनंदाने वेडावून गेलेला जॉर्ज प्रवेशासाठी विद्यापीठात पोहोचला. घडलं मात्र वेगळंच. त्याला प्रत्यक्ष पाहिल्यावर विद्यापीठाकडून प्रवेश नाकारला गेला, “तुम्ही निग्रो आहात, आम्ही निग्रो मुलांना प्रवेश देत नाही.” असं अपमान जनक उत्तर देण्यात आलं.  

   १८६५ साली कायदा करून अमेरिकेतील गुलामगिरी नष्ट झाल्याचं घोषित करण्यात आलं होतं. मात्र कर्मठांच्या मनातील वर्णद्वेष जात जात नव्हता. त्याची झळ जॉर्ज कार्व्हर यांना आयुष्यभर सोसावी लागली.

शिक्षण व संशोधनातील यशस्वी झेप.

   एकीकडे वर्णद्वेषाचे तडाखे सोसत असतांना, जॉर्ज मधील गुण ओळखून मायेचा ओलावा देणारे मदतीचे हातही सरसावत होते. ज्ञानयात्रेच्या प्रवासात अनेकांनी त्याला आधार दिला. स्वाभिमानी जोर्जने मात्र कोणाची फुकट मदत घेतली नाही. त्याची परतफेड करण्यासाठी त्यांनी शक्य ते सर्व कष्ट उपसले. शिक्षण आणि संशोधन यातील कार्यामुळे जगभरातून त्यांना बोलावण यायचं. तसेच जगभरातील नामांकित लोकं त्यांना भेटायला टस्कीगो येथे यायचे. जॉर्ज यांची कीर्ती गगनाला भिडली असतांनाही कठीण काळात मदत करणाऱ्या साऱ्यांची जाण आणि जिव्हाळा आयुष्याच्या अखेरपर्यंत कायम ठेवला.

एक होता कार्व्हर सारांश  – प्रेरणादायी पुस्तक परीक्षण (मराठी) पुस्तकपरिचय book review in Marathi
एक होता कार्व्हर सारांश  – प्रेरणादायी पुस्तक परीक्षण (मराठी) पुस्तकपरिचय book review in Marathi


   शिक्षणासाठी जॉर्ज कार्व्हर यांनी केलेला संघर्ष काळीज पिळवटून टाकणारा असला तरी त्यांचा खरा संघर्ष त्यानंतर सुरु होणार होता. आयोवा कॉलेजात प्रा. विल्सन यांच्याकडे वनस्पतीशात्राचा प्राध्यापक आणि प्रा. वॉलेस यांच्या मार्गदर्शनात कृषिशास्त्रात संशोधनाच क्रांतिकारी कार्य जॉर्ज कार्व्हर करत होते. सर्वकाही व्यवस्थित सुरु असतांना त्यांच्या हाती एक दिवस एक पत्र येत.

एक पत्र...... डॉ. बुकर वॉशिंग्टन यांच

एक होता कार्व्हर - प्रेरणादायी प्रवास -  Book review in Marathi

   दक्षिण अमेरिकेतील अलाबमा प्रदेशात टस्किगो येथे निग्रो मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या डॉ. वॉशिंग्टन यांच ते पत्र. अलाबमा म्हणजे दक्षिण अमेरिकेतील एक ओसाड...वैराण...मुलुख. एकेकाळी कापूस उत्पादनामुळे साधन असणारा हा प्रदेश, शेतकऱ्यांच्या अधिक उत्पादनाच्या हव्यासापायी नापीक, बंजर झाला होता. वर्णभेदामुळे खितपत पडलेल्या निग्रोंना याची सर्वाधिक झळ पोहोचली.

   गोऱ्यांच्या शेतावर राबणाऱ्या निग्रो समाजावर उपासमारीची वेळ आली. खायला अन्नच नाही तर, शिक्षण घेऊन काय करायचं? असं दृष्टचक्र निर्माण झालं. या संकटातून प्रदेशाला सोडवण गरजेचं होतं. महाकाय संकटामुळे हताश झालेल्या डॉ. वॉशिंग्टन यांच्या कानावर जॉर्ज कार्व्हर यांची कीर्ती पोहोचली. त्यांनी मदतीसाठी हाक देणारं पत्र जॉर्ज कार्व्हर यांना लिहिलं. पत्राच्या शेवटी ते लिहितात.....

   “मी तुम्हाला पैशाचं, उच्च पदाच व किर्तीच आमिष दाखवू शकत नाही. पहिल्या दोन गोष्टी तुम्ही उपभोगत आहात. शेवटची तुम्ही कुठेही मिळवू शकाल, यात शंका नाही. मी तुम्हाला या गोष्टी सोडायला सांगत आहे. त्यांच्याकडे पाठ फिरवायला विनवत आहे. त्याच्या बदल्यात मी तुमच्यावर काम, अविरत कष्ट आणि शतकानुशतकं दारिद्र्याने गांजलेल्या, गुलामीच्या चिखलात रुतलेल्या दलितांना उद्धरून त्यांना ‘सुजाण मानव’ बनवण्याची कामगिरी सोपवत आहे.”

   समाजाप्रती तळमळ असणाऱ्या जॉर्ज यांनी या पत्राला फक्त तीन शब्दात उत्तर दिले......

“मी येत आहे.”

 आयोवा ते टस्किगो. George Washington Corver प्रेरणादायी प्रवास.

   भुकेच्या खाईला आपली कर्मभूमी मानून पदोपदी कसोटी बघणारी आव्हान पेलण्याचा प्रदीर्घ प्रवास टस्किगो शाळेतून सुरु झाला.

एक होता कार्व्हर सारांश  – प्रेरणादायी पुस्तक परीक्षण (मराठी) पुस्तकपरिचय book review in Marathi
एक होता कार्व्हर सारांश  – प्रेरणादायी पुस्तक परीक्षण (मराठी) पुस्तकपरिचय book review in Marathi


   हा प्रवास फक्त निग्रोंच्या उत्थानापुरता मर्यादित न राहता, अमेरिकेच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कृषी, व्यापार, संशोधन अशा महत्वाच्या क्षेत्रात पायाभरणीचा ठरला. दख्खणच्या ओसाड अलाबमाचे नंदनवन झाले. जॉर्ज कार्व्हर यांचे संशोधन मोलाची मदत म्हणून सिध्द झाले.

आयुष्यभर निस्वार्थ सेवा.

   जागतिक कीर्ती मिळालेला हा महामानव आपल्या कार्यात अडथला येवू नये म्हणून अविवाहित राहिला. मोठे-मोठे मानसन्मान, धनदौलतीचे आमिष कार्व्हर यांच्या निस्वार्थी कार्यापुढे गळून पडले. कवडीचाही मोबदला न घेता ते आपल्या समाजाची, राष्ट्राची पर्यायाने जगाची सेवा आयुष्यभर करत राहिले.

   या पुस्तकाच्या माध्यमातून केवळ डॉ. जॉर्ज कार्व्हर यांची ओळख होत नाही, तर संघर्ष, आत्मसन्मान आणि समाजसेवेचा खरा अर्थही उलगडतो. वीणा गवाणकर यांनी लिहिलेले ‘एक होता कार्व्हर’ हे पुस्तक आजच्या पिढीने जरूर वाचावं. प्रेरणेसाठी...सच्च्या नेतृत्वासाठी...आणि स्वतःला ओळखण्यासाठी.

#एक_होता_कार्व्हर #मराठी_पुस्तक_परिचय #पुस्तक_परीक्षण #प्रेरणादायी_चरित्र #George_Corver #वीणा_गवाणकर 


तुम्हाला हा सारांश कसा वाटला?

तुमचं मत खाली comment मध्ये नक्की share करा.

आणि ब्लॉग ला follow नक्की करा.

 https://www.instagram.com/manish_surve_96/        

 https://www.threads.net/ 

 https://x.com/home   

 

जे. एन. यु. मधील प्राध्यापक शरद बाविस्कर यांनी लिहिलेल्या 'भुरा' विषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

https://gramayan.blogspot.com/2023/11/Bhura-by-lekhak-Sharad-Baviskar-Marathi-Book-Bhura-review-introduction.html
https://gramayan.blogspot.com/2023/11/Bhura-by-lekhak-Sharad-Baviskar-Marathi-Book-Bhura-review-introduction.html


https://gramayan.blogspot.com/2024/10/--Motivational-book-in-Marathi---by-Prafulla-Wankhede.html
https://gramayan.blogspot.com/2024/10/--Motivational-book-in-Marathi---by-Prafulla-Wankhede.html




4 comments:

Anonymous said...

अतिशय सुंदर अभ्यासात्मक विश्लेषण. अगदी मोजक्या शब्दांत संपुर्ण पुस्तक वाचल्याची अनुभूती देणारा सारांश. संशोधन कित्येक लोकांचं आयुष्य बदलू शकत.

Anonymous said...

Nice

Anonymous said...

Nice

Anonymous said...

Great 👍👍